भाजपाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
कोल्हापूर • प्रतिनिधी
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी ऐतिहासिक बिंदू चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३० वी जयंती भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाख मेणबत्या लावण्याचा संकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने करण्यात आला आहे.
भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने अनुसूचित जाती मोर्चातर्फे कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मेणबत्ती प्रज्वलित करून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भाजपा जिल्हा कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाजपा राजारामपुरी मंडलाच्यावतीने राजेंद्रनगर काळे गल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य लाभ या योजनेअंतर्गत या भागातील १० विधवा महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे हस्ते देण्यात आला. त्याचबरोबर भागातील ५० लाभार्थ्यांना आयुष्यमान गोल्डन कार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन दत्ता लोखंडे, देवराज लोंढे, प्रसाद पाटोळे, अजय कांबळे, आबाराव कांबळे आदींनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंह निकम, माजी नगरसेवक महेश वासुदेव, राहूल कांबळे, नामदेव नागटिळे, अमोल लोंढे, मंगल तावरे, राजश्री कांबळे, रेखा लोखंडे, बापू राणे, अभिजित शिंदे, दिलीप बोंद्रे, दिनेश पसारे आदींसह भागातील नागरीक उपस्थित होते.
भाजपा मंगळवार पेठ मंडलाच्यावतीने सुर्वेनगर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. शिवाजीराव सुदर्शनी यांनी बुद्ध वंदना घेतली. सुर्वेनगर येथील भाजपा पदाधिकारी राजू वडगांवकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी भाजपा मंगळवार पेठ मंडल अध्यक्ष संतोष माळी, विजयसिंह खाडे-पाटील, अनिल कामत, राज नरके, राजू बद्दी, सुभाष माळी, सुनील वाडकर, राजू जाधव यांच्यासह सुर्वेनगर येथील श्री. द्रवीड, संजय सुदर्शनी, जयसिंग वडगांवकर, अशोक कांबळे, रणजीत कांबळे, अनिरुद्ध कांबळे, राजेंद्र कांबळे, दिलीप कांबळे आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.
कसबा बावडा येथे फतेली पाणंद झोपडपट्टी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याठिकाणी भागातील २५ नागरिकांना आयुष्यमान गोल्डन कार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन भाजपा अनुसुचीत जाती मोर्चा अध्यक्ष अमर साठे, भाजपा चिटणीस प्रदीप उलपे यांनी केले. याप्रसंगी शहाजी सनदे, उमाजी सनदे, चंद्रकांत घाटगे, धीरज पाटील, तानाजी रणदिवे, सुनील बुचडे, नंदू वायदंडे, प्रथमेश कांबळे, राजाराम परीट आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.
उत्तरेश्वर पेठ मंडलाच्यावतीने शाहू चौक लक्षतीर्थ वसाहत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्ष भरत काळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे नियोजन अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस इकबाल हकीम यांनी केले. याप्रसंगी दीपक काटकर, विराज चिखलीकर, दिग्विजय कालेकर, इरफान मुल्ला, संजय पाटील यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.
सिद्धार्थनगर येथे उत्तरेश्वर मंडलाअंतर्गत भाजपा पदाधिकारी सीमा बारामते यांच्यावतीने राजर्षी शाहू समाज मंदीर सिद्धार्थनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष भरत काळे, सिमा बारामते, संदीप कुंभार, विनित बारामते तसेच भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.