मोदी सरकारच्या ७ वर्षपूर्तीबद्दल भाजपाच्यावतीने ‘सेवा ही संघटन’ उपक्रम

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ७ वर्षाच्या पूर्तीनिमित्य भाजपाच्यावतीने “सेवा ही संघटन” या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूरात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत ‘सेवा ही संघटन’ हा उपक्रम राबविण्यात आला.
     कोल्हापूरात आज ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्यावतीने निवृत्ती चौक येथे आशा वर्करना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू वितरण करण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राउत, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
      यानंतर मंगळवार पेठेतील पद्मावती मंदीर नजीकच्या सार्वजनिक स्वच्छतागृह सफाई मोहिम राबविण्यात आली. ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पीपीई कीट घालून सॅनिटायझर फवारणी केली.
      कोल्हापूर शहर जिल्ह्यातील सात मंडलांमध्ये आज भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपन्न झाले. टेंबलाईवाडी, कनाननगर झोपडपट्टी, यादवनगर मेन रोड, पद्मावती मंदिर नजीक, लाड चौक न्यू महाद्वार रोड, गंगावेश परिसर अशा मंडलातील सात ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई करण्यात आली.
निवृत्ती चौक, पद्मावती गार्डन, गणपतराव माने हॉल उत्तरेश्वर, राजारामपुरी ९ नंबर शाळा, सावित्रीबाई फुले रुग्णालय, गोळीबार मैदान परिसर अशा सात ठिकाणी मंडलांमधील आशासेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा भाजपा प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. सदरबाजार लसीकरण केंद्रामध्ये ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते महिलांना सन्मानपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. मंगलधाम कार्यालय, आयसोलेशन हॉस्पीटल, पंचगंगा हॉस्पिटल, जैन मठ, शहाजी कॉलेज, सायबर कॉलेज, कसबा बावडा कोविड सेंटर याठिकाणी कोविड काळजी केंद्रात आयुर्वेदीक व शक्तीवर्धक काढा वितरण करण्यात आले. सीपीआर व सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे चपाती-भाजी वितरण करण्यात आले. 
     भाजपाचे पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते यांनी आज विविध सामाजिक उपक्रम राबवून आजचा ‘सेवा ही संघटन’ उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबविला.
     कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय जाधव, गणेश देसाई, संतोष माळी, भरत काळे, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, रविंद्र मुतगी, डॉ. राजवर्धन  यांनी विशेष प्रयत्न केले.
       मंडल निहाय कार्यक्रमामध्ये राजारामपुरी मंडलामध्ये सुनीलसिंह चव्हाण, दिनेश पसारे, अभिजित शिंदे, बापू राणे, मानसिंग पाटील, दिलीप बोंद्रे, महादेव बीरजे, दत्ता लोखंडे, देवराज लोंढे, ओंकार घाटगे, रहीम सनदी, माणिक बाकळे, शिवाजी पेठ मंडलामध्ये महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राउत, आसावरी जुगदार, विजय आगरवाल, राजेंद्र जाधव, गिरीष साळोखे, सुधीर हराळे, सुजित जाधव, सागर जाधव, लता बर्गे, प्राची कुलकर्णी, शाहूपुरी मंडलामध्ये संतोष भिवटे, आशिष ढवळे, अनुप देसाई, राजेंद्र माळगे, रितेश नेवरेकर, देवेंद्र जोंधळे, लक्ष्मीपुरी मंडलामध्ये मारुती भागोजी, सचिन तोडकर, विवेक कुलकर्णी, अतुल चव्हाण, अप्पा लाड, विशाल शिराळकर, प्रवीणचंद्र शिंदे, ओंकार खराडे, सुधीर खराडे, सुजाता पाटील, मंगल निप्पानीकर, महेश यादव, विजयमाला जाधव, अशोक जाधव, कसबा बावडा मंडलामध्ये चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, संजय जासूद, धीरज पाटील, अमर साठे, मनोज इंगळे, तानाजी रणदिवे, विवेक राजवर्धन, रवी पोवार, उत्तरेश्वर मंडलामध्ये दीपक काटकर, दिग्विजय कालेकर, संदीप कुंभार, विराज चिखलीकर, साजन माने, प्रसाद मोहिते, विद्या बनछोडे, सचिन मुधाले, इकबाल हकीम, सुशांत पाटील, राजू कुंभार, शाहरुख गडवाले, मंगळवार पेठ मंडलामध्ये गणेश देसाई, संतोष माळी, विजयसिंह खाडे-पाटील, सुभाष माळी, प्रीतम यादव, सुधीर देसाई, गणेश चिले, राजाराम नरके, सयाजी आळवेकर, किशोरी स्वामी, सुलभा मुजूमदार, प्रमोदिनी हार्डीकर, सरिता माळी, पद्मजा माळी, राधिका कुलकर्णी, रोहित कारंडे, स्वाती कदम, बाबासाहेब चपाले, प्रमोद पाटील, अमोल आळवेकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!