![]() |
कोल्हापूर • प्रतिनिधी
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने तयारी सुरु करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा कोल्हापूर जिल्हा प्रभारी, माजी खासदार अमर साबळे हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कोल्हापूरात दाखल झाले. छत्रपती ताराराणी चौक येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
यानंतर भाजपा जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक संपन्न झाली. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी त्यांचे स्वागत केले.
बैठकीच्या सुरवातीला भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी भाजपा कोल्हापूरच्यावतीने सुरु असलेल्या निवडणूक कार्याचा आढवा देऊन भाजपा कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीसाठी सकारात्मक असल्याचे नमूद केले.
भाजपा पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडीक यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे कोल्हापूरात झाली आहेत, वैद्यकीय मदत, शहर सुशोभीकरण अशा अनेक गोष्टींमध्ये चांगले कार्य झाले असल्याचे नमूद केले. महापालिकेमध्ये सत्ता असणा-यांनी शहराच्या विकासासाठी कोणतेही भरीव कार्य केले नसल्याची टीका केली.
प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सत्तारूढ कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट पाईपलाईन, ड्रेनेज व्यवस्था, घरफाळा घोटाळा अशा अनेक विषयांमुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळत नसल्याचे नमूद केले.
याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना अमर साबळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे संघटन हेच विजयाचे सूत्र असल्याचे नमूद केले. महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवण्यासाठी महापालिका निवडणूक हे एकमेव उद्दिष्ट ठेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पार्टीसाठी आपले कर्तव्य पार पाडावे, संघटन मजबूत करावे असे आवाहन केले. हैद्राबाद, पश्चिम बंगाल या क्षेत्रातील उदाहरणे देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला संपूर्ण देशात लोकांचा प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर कोल्हापूर मधील स्थानिक भाजपा नेते यांचे सोबत एकदिलाने, कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीचा असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, को.म.न.पा भाजपा माजी गटनेते अजित ठाणेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, अमोल पालोजी, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, जिल्हा चिटणीस प्रमोदिनी हर्डीकर, दीपक काटकर, प्रदीप उलपे, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राउत, युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, डॉ.राजवर्धन, विवेक कुलकर्णी, प्रग्नेश हमलाई, संतोष माळी, अभिजित शिंदे, संजय जासूद, सुशांत पाटील, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, गणेश चिले, आसावरी जुगदार, संदीप कुंभार, अरविंद वडगांवकर, मंगला निपाणीकर, शौलेश जाधव, विवेक वोरा, गिरीष साळोखे, दिलीप बोंद्रे, अमर साठे, अनिल कामत, प्रसाद नरुले, विठ्ठल पाटील, पृथ्वीराज जाधव आदी उपस्थित होते