भाजपातर्फे सिने-नाट्य कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांना धान्यकिटचे वितरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भाजपाच्यावतीने बिंदू चौक येथील कार्यालयात सिने-नाट्य कलाकार, तंत्रज्ञ व कामगार यांना भाजपा प्र.का. सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांचे हस्ते धान्यकिटचे वितरण करण्यात आले.
    कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे अर्थचक्र थांबले असून याचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला आहे. सर्वांना उदरनिर्वाहासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.  मराठी चित्रपटसृष्टीतील सिने-नाट्य कलाकार, तंत्रज्ञ व कामगार याला अपवाद राहिले नाहीत. कोल्हापूरात हजारोंच्या संख्येने चित्रपटसृष्टीशी निगडीत उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. मात्र रोजगार उपलब्ध नसल्याने संकटात सापडले आहेत. भाजपाच्यावतीने कोरोना संकटकाळात “सेवा ही संघटन” या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचे कार्य भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्याद्वारे आज भाजपा कार्यालय येथे सिने-नाट्य कलाकार, तंत्रज्ञ व कामगार यांना  धान्यकिटचे वितरण करण्यात आले.
    याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, भाजपा चित्रपट कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष महादेव साळोखे, भाजपा चित्रपट आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मंगेश लिंगनूरकर, कोल्हापूर जिल्हा सहप्रभारी सौ. सुषमाताई ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!