• सीपीआर व सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे सेवा
कोल्हापूर • प्रतिनिधी
दिवसेंदिवस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट गडद होत चालले आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील अनेक रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांना जेवण मिळण्यासाठी कसरत होताना दिसत आहे. अशा अनेक लोकांची गरज ओळखून भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध सेवाकार्य सुरू आहेत. भाजपातर्फे आजपासून सीपीआर रुग्णालय व सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे पेशंटच्या नातेवाईकांना मोफत चपाती-भाजी उपक्रम सुरू करण्यात आला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सीपीआर रुग्णालय व सावित्रीबाई फुले रुग्णालयात पेशंटच्या नातेवाइकांना मोफत चपाती-भाजीचे वितरण करण्यात आले. आजपासून याठिकाणी भाजपाच्यावतीने ही सेवा सुरू राहणार असून अशा कठिणप्रसंगी हा उपक्रम पेशंटच्या नातेवाईकांना निश्चितच समाधान देणारा असल्याचे आम. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, भाजपा जिलाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, ग्रामीण सरचिटणीस विठ्ठल पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत आदी मान्यवरांच्या हस्ते चपाती-भाजीचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, दिग्विजय कालेकर, हितेंद्र पटेल, मंडल अध्यक्ष डॉ.राजवर्धन, भरत काळे, संतोष माळी, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, रविंद्र मुतगी, विराज चिखलीकर, संजय जासूद, महेश यादव, विक्रम राठोड, शैलेश नाळे, धीरज पाटील, संदीप कुंभार, गिरीष साळोखे, प्रसाद मोहिते, सुधीर खराडे, ओंकार खराडे, महेश मोरे, दिनेश पसारे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या सेवा कार्यासाठी भाजपा उपाध्यक्ष सचिन तोडकर व भाजपा ग्रामीण किसान मोर्चा अध्यक्ष भगवानराव काटे यांनी विशेष प्रयत्न केले.