भाजपाने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
      महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ तसेच जळलेला डीपी वीजबील भरल्याशिवाय देणार नाही अशी आडमुठी भूमिका घेणार्‍या महावितरणच्या निषेधार्थ शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कार्यालयाला “टाळा ठोको व हल्लाबोल” आंदोलन करण्यात येत आहे. याच विषयासाठी भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्य महावितरण कार्यालय ताराबाई पार्क याठिकाणी जोरदार निदर्शने करून “टाळा ठोको व हल्लाबोल” आंदोलन करण्यात आले.
    दरम्यान, महावितरण कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकत असताना पोलीस व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार व महावितरण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
     कोरोनामुळे आधीच जनतेची आर्थिक अडचण निर्माण झाली असून त्यात भर म्हणून महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिले जनतेवर लादली, ही वीज बिले माफ व्हावीत म्हणून भाजपाने यापूर्वीदेखील महावितरण कार्यालयाच्या दारामध्ये वाढीव वीज बिलांची होळी केली होती. वीज बिले माफ न करता महावितरणने ७५ लाख ग्राहकांना १५ दिवसांत वीज बिल नाही भरले तर कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली. याविरोधात आज भारतीय जनता पार्टीने जोरदार निदर्शने करून कोल्हापूर मधील ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारातून आत प्रवेश करत गेट नंबर दोन ला कार्यकर्त्यांनी साखळदंड बांधून टाळे ठोकले.
     यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, किसान मोर्चा अध्यक्ष भगवान काटे, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक हेमंत आराध्ये यांनी केले.
     यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, मारुती भागोजी, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, डॉ.सदानंद राजवर्धन, रविंद्र मुतगी, भरत काळे, संतोष माळी, धीरज पाटील, संजय जासूद, आशिष कपडेकर, अभिजित शिंदे, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, साजन माने, युवा मोर्चा अध्यक्ष विजय खाडे-पाटील, संदीप कुंभार, विवेक वोरा, वल्लभ देसाई, गौरव सातपुते, सुमित पारखे, विराज चिखलीकर, गिरीश साळोखे, विशाल शिराळकर, आसावरी जुगदार, विरेंद्र मोहिते, प्रसाद मोहिते, पुष्कर श्रीखंडे, विवेक राजवर्धन, सुनील पाटील, किशोर लाड, आप्पा लाड, दिलीप बोंद्रे, बापू राणे, अमर साठे, महादेव बिरजे, योगेश साळोखे, कविता लाड, मंगला निप्पाणीकर, विद्या बनछोडे, प्रज्ञा मालंडकर, विद्या तेली, ऐश्वर्या जुगदार, चिनार गाताडे, प्रीतम यादव, दिनेश पसारे, सचिन मुधाले, हर्षद कुंभोजकर, पृथ्वीराज जाधव, कार्तिकी सातपुते, सचिन सुराणा, प्रशांत गजगेश्वर, शैलेश जाधव, नरेंद्र पाटील, राहूल रायकर, शशिकांत रणवरे, इकबाल हकीम, भैया शेटके, राजू माळगे, मामा कोळवणकर, प्रवीणसिंह शिंदे, प्रसाद नरुले, तानाजी रनदिवे, मनोज इंगळे, कृष्णा आतवाडकर, अक्षय निरोखेकर, सिद्धार्थ तोरस्कार, महेश यादव, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!