महापालिका निवडणुकीत भाजपा महिला नगरसेविकांची संख्या वाढेल: सौ.उमा खापरे


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा सौ. उमा खापरे यांच्या उपस्थितीत भाजपा महिला मोर्चाची सोमवारी बैठक झाली. आगामी महापालिका निवडणुकीत महिला नगरसेविकांची संख्या नक्कीच वाढेल, अशी खात्री सौ. उमा खापरे यांनी व्यक्त केली.
    यावेळी महानगरपालिका निवडणूक संघटनात्मक रचनेबाबत सौ.उमा खापरे यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपा महिला वॉर्ड अध्यक्ष व महिला बूथ प्रमुख नेमून महिलांचे संघटन वाढवावे असे आवाहन केले.केंद्रातील मोदी सरकारने महिला सबलीकरणासाठी चांगल्या योजना आणल्या आहेत, त्या योजना समाजातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहचवणे आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
     यावेळी आगामी महानगरपालिका निवडणूक संदर्भात प.म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस कोल्हापूर महिला आघाडी प्रभारी सौ. सुवर्णा पाटील, सौ. किशोरी स्वामी, प्रमोदिनी हर्डीकर, आसावरी जुगदार, सुषमा गर्दे, मंगल निप्पणीकर, स्वाती कदम, गौरी जाधव, सौ. शुभांगी चितारे, सौ. श्वेता कुलकर्णी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
         मंडल अध्यक्षांची निवड …..
     महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांनी भाजपाच्या सात महिला मंडल अध्यक्षांची निवडीचे पत्र देऊन घोषणा केली. सौ. सुरभी घाटगे यांची शिवाजी पेठ मंडल अध्यक्षा, सौ. वंदना नायकवडी यांची उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्षा, सौ. निकिता यादव यांची राजारामपुरी मंडल अध्यक्षा, सौ. अश्विनी साळोखे यांची लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *