कोल्हापूर • प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय सुनावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले आहे त्यामुळे या नाकर्ते सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व ओ.बी.सी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज “जन आक्रोश” आंदोलन करण्यात येत आहे. आज कोल्हापूर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व ओ.बी.सी.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “जन आक्रोश” आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या सुरवातीला भारतीय जनता पार्टीचे नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ओ.बी.सी.मोर्च्याच्यावतीने अपर चिटणीस जिल्हाधिकारी कार्यालय संतोष कणसे यांना निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, गणेश देसाई, ओ.बी.सी.महिला मोर्चा प्रमुख विद्या बनछोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, दिग्विजय कालेकर, विजय आगरवाल, महेश यादव, राजाराम परिट, अरविंद वडगावकर, दीपक पेटकर, प्रकाश कालेकर, सतीश यादव, संजय खेडकर, श्रीशैल्य स्वामी, संतोष पाखरे, सचिन काकडे, विजय कालेकर, अभिजित पोवार, साजन माजगांवकर, संध्या तेली, विद्या बागडी, समीना मस्तानवाले, सुरेखा पाखरे, दिपाली बनछोडे, विशाल शिराळकर, अजिंक्य माळी, संतोष अस्वले, आकाश चिखलीकर, अक्षय पाटील, पृथ्वीराज पालकर, काना निगवेकर, सौरभ ठाणेकर, राजू बिडकर, संकेत निगवेकर, सोमेश बिडकर, केदार पाडळकर, सुरज कुंभार, आदिनाथ माजगांवकर आदींसह भाजपा ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते