भाजपातर्फे जिल्ह्यात ५ कोविड सेंटर व अलगीकरण केंद्र सुरू


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्यावतीने कोल्हापूर जिल्हयात ५ कोविड सेंटर व अलगीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
     “सेवा हेच संघटन” हे कार्य मानून ही कोविड केंद्र सुरु करण्यात आली असून या प्रत्येक कोविड सेंटर्सना आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहयोगातून “ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर ” प्रदान करण्यात आला.
      भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील व सरचिटणीस विठ्ठल पाटील यांचे हस्ते हे मशीन नेसरी सेंटरसाठी जि.प. सदस्य हेमंत कोलेकर यांचेकडे, भादोले सेंटरसाठी किसान मोर्चाचे सरचिटणीस नाना जाधव यांचेकडे, मोरेवाडी – पाचगांव सेंटरसाठी दक्षिण कोल्हापूर अध्यक्ष महेश मोरे व पृथ्वीराज जाधव यांचेकडे तर पट्टणकोडोली सेंटरसाठी सिद्राम माडग्याळ यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *