भाजपाच्यावतीने गरजू रूग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बँकेची सेवा कार्यरत

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपा कार्यालयात मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन बँक करण्यात येत आहे. आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने भाजपा कार्यालय  येथे सध्याच्या काळात कोविड रुग्णांना उपयुक्त असणाऱ्या ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
      ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजन मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ, ऑक्सिजन प्लांटमधून कमी पुरवठा यामुळे सर्वत्र ऑक्सिजनची प्रमाणापेक्षा जास्त मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सेवा कार्य म्हणून भाजपाच्यावतीने ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बँक हि संकल्पना सुरु करण्यात आली आहे.
      याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोविड रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरीराची श्वासनक्रिया नैसर्गिक पद्धतीने सुरु होण्यासाठी मदत करणारे हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हे मशीन डॉक्टरांच्या सल्यानुसार वापरायचे असून घरी ऑक्सिजनची गरज आहे, असे डॉक्टरांनी सुचविलेल्या गरजू रुग्णांसाठी ही सुविधा भाजपातर्फे  मोफत सुरू करण्यात आली आले. हा उपक्रम सुरु केल्यावर त्वरीतच ३० ते ३५ रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत मागणी केली आहे. मशीनची खरेदी रक्कम सध्या चढ्यादराने होत असून सर्वसामान्य नागरिकांना एक स्वतंत्र मशीन खरेदी करणे परवडणारे नाही. त्याचबरोबर भाडेतत्वावरदेखील अशा मशीन आता उपलब्ध होत नाहीत.  त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विचार करता ही सेवा मोफत करण्यात येत आहे. एका रुग्णांकडून हे मशीन वापरून परत आल्यानंतर ते व्यवस्थित सॅनिटाईज करून दुसऱ्या रुग्णाला वापरण्यासाठी दिले जाणार आहे. सध्या बाजारात या मशीनचा तुटवडा असल्याने जेथून शक्य होईल तेथून हे मशीन उपलब्ध करण्याचा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे.
       यावेळी डॉ. महेंद्र यादव यांनी उपस्थितांना या मशीनबाबत सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, ग्रामीण सरचिटणीस विठ्ठल पाटील, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, सचिन साळोखे, प्रितम यादव, पृथ्वीराज जाधव, महेश मोरे, सिद्धेश्वर पिसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!