भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेच्या न्यायसाठी कार्यरत रहावे : आ. पाटील

भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेच्या न्याय हक्कासाठी कार्यरत रहावे : आ. पाटील
कोल्हापूर • प्रतिनिधी
     भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी बिंदू चौक येथील भाजपा कार्यालयात प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी-मोर्चे यांचे अध्यक्ष व संयोजक यांना महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीबद्दल अवगत करून बुथ रचना, ६ एप्रिल भाजपा स्थापना दिवस व दि.१४ रोजी होणारी डॉ.आंबेडकर जयंती अशा कार्यक्रमांबद्दल मार्गदर्शन केले. 
     सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्य शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून आपापल्या प्रभागात करत असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.
     याप्रसंगी बोलताना आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यातील बिघडत चाललेली कोरोना परिस्थिती, भ्रष्टाचार, गैरव्यवहार, मंत्र्यावर होणारे आरोप यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. सरकारमध्ये कोणत्याही गोष्टीत ताळमेळ नाही, एकाच विषयासाठी तिघांच्या तीन भुमिका पहायला मिळतात. त्यामुळे सध्याचे राजकारण हे सोईचे राजकारण बनले आहे. राज्याच्या विकासासाठी एकमेकांना मदत न करता हे सरकार विविध चुकीच्या प्रकरणात एकमेकांना मदत किंवा पाठराखण करत असल्याचे दिसत आहे.  वाढीव वीजबील, वीज तोडणी, महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी त्याचबरोबर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे फक्त प्रवचन करताना दिसतात. अशावेळी भाजप प्रबळ विरोधी पक्ष म्हणून कामगिरी पार पाडत आहे. पक्षाची हीच संघटनात्मक कार्यप्रणाली जपून कार्यकर्त्यांनी सदैव जनतेच्या सेवेत राहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. त्याचबरोवर जनतेच्या न्याय हक्कासाठी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी कार्यकर्त्यांनी सोडू नये, असेही त्यांनी सांगितले.
    तसेच आगामी संघटनात्मक विषय व कार्यक्रमांची माहिती देत ६ एप्रिल पक्षाचा स्थापना दिवस यानिमित्य प्रत्येक कार्यकर्त्याने घरावर भाजपचा झेंडा लावावा, दारात रांगोळी काढावी, प्रत्येकाने आपल्या घराच्या दारावर कमळाची प्रतिमा लावावी अशा पद्धतीने कार्यक्रम करून प्रत्येक बुथवर स्थापना दिवस साजरा करावा त्याचबरोबर १४ एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून महाराष्ट्रभर ही जयंती उत्साहात साजरी करायची आहे. आपणही कोल्हापुरात जास्तीत जास्त ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यासमोर मेणबत्त्या लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करायचे आहे. तरी सर्वांनी या दोन्ही कार्यक्रमासाठी अत्यंत उत्साहात काम करावे असे सांगितले.
      पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दि.१७ एप्रिल रोजी मतदान होत असून समाधान अवताडे भाजपाचे उमेदवार असून या विधानसभा क्षेत्रातील आपले नातेवाईक, मित्र परिवार, व्यावसायिक मित्र यांच्याशी संपर्क साधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करावे असे सांगितले.
     याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, संतोष भिवटे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, चिटणीस प्रमोदिनी हार्डीकर, दिपक काटकर, प्रदिप उलपे, सुनिलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, मंडल अध्यक्ष भरत काळे, विवेक कुलकर्णी, रविंद्र मुतगी, आशिष कपडेकर, संतोष माळी, युवा मोर्चाचे विजयसिंह खाडे, गायत्री राऊत, संदीप कुंभार, महेश यादव, अमर साठे, विक्रम राठोड, सचिन सुराना, नरेंद्र पाटील, दिलीप बोंद्रे, शैलेश जाधव, गिरीष साळोखे, विवेक वोरा, इकबाल हकीम, दिनेश पसारे, बापू राणे, महादेव बिरजे, अभिजित शिंदे, धीरज पाटील, विराज उलपे, विशाल शिराळकर, आप्पा लाड, प्रितम यादव, मंगला निपाणीकर, आसावरी जुगदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *