कोल्हापूर • प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. भाजपा जिल्हा कार्यालयात प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांनी उपस्थित महिलांना महिला मोर्चाचे कार्य, जबाबदारी याविषयी माहिती दिली.
नूतन कार्यकारणी
सरचिटणीस – आसावरी जुगदार, मंगला निपाणीकर, उपाध्यक्ष – विजयमाला जाधव, शोभा भोसले, शोभा कोळी, लता बर्गे, प्राची कुलकर्णी, शुभांगी चितारे, कविता पाटील, कोषाध्यक्ष – सुनिता सूर्यवंशी.
…………..