कोल्हापूर • प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व धार्मिकस्थळांना कुलुपात बंद करुन ठेवले होते. मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आंदोलन केले. अखेर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे खुली करण्यात आली. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने महाद्वार चौक येथे “विजयोत्सव” साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी अंबामाता की जय, उदं ग आई उदं, जोतिबाच्या नावानं चांगभलं, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या. यानंतर उपस्थित नागरिकांना साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, सरचिटणीस हेमंत आराध्ये, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, भाजपा प्रवक्ते विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरचिटणीस गणेश देसाई, प्रदीप उलपे, विजय आगरवाल, विजयसिंह खाडे-पाटील, अभिजित शिंदे, नझिर देसाई, इकबाल हकीम, डॉ राजवर्धन, भरत काळे, आशिष कपडेकर, सुजाता पाटील, विशाल शिराळकर, गणेश चिले, दिलीप बोन्द्रे, तानाजी निकम, अशोक लोहार, राजाराम परिट, विराज चिखलीकर, सुधीर देसाई, सचिन साळोखे, रवींद्र घाटगे, महेश यादव, अनिल कामत, प्रीतम यादव, सिद्धू पिसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.