कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोनासारख्या गंभीर जागतिक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी आपला खारीचा वाटा उचलावा म्हणून कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने नाम. सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कुर (ता.भुदरगड) येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे संयोजन जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. संजय सरदेसाई यांनी केले. या शिबिरात ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमास पालकमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई, बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, सुशील पाटील कौलवकर, अभिषेक अरुण डोंगळे, एस.एम पाटील, शंभूराजे देसाई, वैभवराज तहसीलदार, भुजंगराव मगदूम, बाबासाहेब देसाई, अरुणराजे भोसले, युवराज पाटील, डॉ.लखन भोगम, राजू इंगळे, धनाजी कुरळे,उत्तम पाटील, नवनाथ पाटील (गुडाळ), उदय पाटील (गंगापूर) व भागातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते