झुंजार क्लबतर्फे रक्तदान शिबीर


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवाजी पेठेतील झुंजार क्लबच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. वैभवलक्ष्मी ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबीरात पुरुषांप्रमाणेच महिलांनीही सहभागी होऊन रक्तदान केले.
     कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. उपचारासाठी रुग्णालयात कोरोनारूग्णांची संख्या वाढत आहे. कांही गंभीर रूग्ण आहेत, त्यांना रक्ताची गरज भासत आहे. वेळेत रक्त मिळविण्यासाठी अनेकदा धावपळ करावी लागते. अशा कठीण परिस्थितीत रूग्णांचे नातेवाईक यांच्यासह रूग्णालय व शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. ही गरज लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी म्हणून झुंजार क्लबच्यावतीने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले.
     झुंजार क्लबचे कार्यकर्ते चेतन साळोखे, उमेश साळोखे, दिग्विजय साळोखे, शाहू भोईटे, संतोष देवडी, रितेश राजवाडे, निलेश झेंडे, सागर पाटोळे, प्रतिक साळोखे, महेश साळोखे आदींनी रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेझुंजार क्लबतर्फे रक्तदान शिबीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *