डॉ. राजेंद्र पाटील यांच्या “झाडावरचं होस्टेल” या कथासंग्रहाचे प्रकाशन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     डॉ. राजेंद्र पाटील यांनी लिहिलेल्या ” झाडावरचं होस्टेल ” या विनोदी कथासंग्रहाचे  प्रकाशन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शुक्रवारी न्यू पॅलेस येथे झाले.
     पक्षी झाडावरती येतात, बसतात, राहतात आणि काही काळाने निघून जातात. तसेच एखाद्या वटवृक्षाप्रमाणे नवनवीन मुलांना आसरा देणारे वसतीगृह म्हणजेच “झाडावरचं होस्टेल” .
      स्वतःचे दुःख, येणाऱ्या अडचणी विसरून एकमेकांना सावरणारे, पक्षांप्रमाणे स्वच्छ आकाशात भरारी मारणारे, खिसा रिकामा असला तरी आनंदाचा अफाट खजिना घेऊन फिरणारी पाखरं म्हणजे या विनोदी कथासंग्रहातील मित्रमंडळी. यांच्या जीवनातील विविध घटना – प्रसंगांचा विनोदी मनातील मरगळ दूर करणारा कथासंग्रह झाडावरचं होस्टेल निश्चितच वाचनीय आहे.
      या पुस्तक प्रकाशनप्रसंगी डॉ. बेलनेकर, जयदीप पाटील, आर्टिस्ट दिनकर कुंभार, रंगराव चौगुले, जावेद मुल्ला, डॉ. बी. के. कांबळे, किशोर सुर्वे, संदीप जाधव, संजय कुंभार, बाळासाहेब सासवडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!