मेहता पब्लिशिंग हाऊसचे ग्रंथप्रदर्शन म्हणजे दिवाळीपूर्वी आनंदोत्सव: सोनाली नवांगुळ

Spread the love

मेहता पब्लिशिंग हाऊसचे ग्रंथप्रदर्शन म्हणजे दिवाळीपूर्वी आनंदोत्सव: सोनाली नवांगुळ
कोल्हापूर • प्रतिनिधी
     ‘कोरोनाच्या साथीमुळे दोन वर्ष भयग्रस्त अवस्थेत जगणाऱ्या माणसांच्या मनांना मेहता पब्लिकेशन हाऊसच्या ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तकांच्या सहवासाने नवचैतन्य लाभेल!’ असा विश्वास ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराचा सन्मान जाहीर झालेल्या लेखिका सोनाली नवांगुळ यांनी व्यक्त केला.
     शुक्रवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती नवांगुळ यांच्या हस्ते झाले. 
     श्रीमती नवांगुळ म्हणाल्या की, किंमतीत भरघोस सवलत असल्याने वाचनप्रेमींसाठी कोरोनाकाळानंतरचे हे पहिले पुस्तक प्रदर्शन म्हणजे दिवाळीपूर्वीचा आनंदोत्सव ठरेल.   
     यावेळी प्रकाशक अनिल मेहता, वाचनकट्टा चळवळीचे प्रवर्तक युवराज कदम, मिलिंद कोलटकर व यांच्या पत्नी व लेखिका मेघा कुलकर्णी-कोल्हटकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 
      कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले असतानाही मेहता पब्लिशिंग हाऊसने वाचकांसाठी नवनवी पुस्तक प्रकाशित करणे सुरू ठेवले होते. गेल्या एका वर्षांत मेहता पब्लिशिंग हाऊसने जवळपास चाळीस नवी पुस्तके प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांसह वि.स.खांडेकर, रणजित देसाई, आनंद यादव, व. पु. काळे, विश्वास पाटील, सुधा मूर्ती, शांता शेळके, शंकर पाटील शिवाजी सावंत, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, एस. एल. भैरप्पा, तसलीमा नसरीन, किरण बेदी, अरुण शौरी, नाना पालखीवाला अशा अनेक मान्यवरांची पुस्तके परवडणाऱ्या किंमतीत वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ ते १० ऑक्टोबर या कालावधीमध्ये राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात सुमारे दोन हजार पुस्तके मांडण्यात आली असून किमान तेराशे रुपयांच्या खरेदीवर ३५ टक्के इतकी किंमतीतील सूट पुस्तकप्रेमींना दिली जाणार आहेत. काही निवडक पुस्तकाला तर किंमतीत ५० टक्के इतकी सूट आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!