बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पथकाचा प्रशासक डॉ.बलकवडे यांच्या हस्ते सत्कार


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर शहरामध्ये उद्भवलेल्या महापूराच्या कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडील सक्शन कम जेटिंग वुईथ रिसाईकल मशीन महापालिकेस उपलब्ध झाले होते. या सक्शन कम जेटिंग वुईथ रिसाईकल मशीनबरोबर २ अधिकारी व ७ कर्मचारी कोल्हापूरात दाखल झाले होते. सक्शन कम जेटिंग वुईथ रिसाईकल मशीनद्वारे पूरबाधीत क्षेत्रातील, संपुर्ण शहर व सलग्न उपनगरामध्ये असणारे ड्रेनेज लाईनचे चोकअप काढणे, गाळ उपसा करण्याचे कामे करण्यात आले. या सक्शन कम जेटिंग वुईथ रिसाईकल मशीनमुळे शहरातील चोकअप लाईनचे काम युध्दपातळीवर करण्यास मदत झाली आहे. २०१९ च्या पूरानंतरही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने सक्शन कम जेटिंग वुईथ रिसाईकल मशीनद्वारे काम केले होते. या पथकातील कनिष्ठ अभियंता आकाश रैनाक, सुपरवाईजर (आर्यन पंप्स) विक्रम गायकवाड व त्यांच्या ७ कर्मचाऱ्यांचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
     यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त निखिल मोरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर व सर्व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *