नगररचना विभागामार्फत शुक्रवारी बांधकाम परवानगी, भोगवट्यासाठी विशेष कॅम्प

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शासन निर्णयानुसार दि.५ मे २०२१ रोजी पासून नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी, भोगवटा व विकास कामे मंजुरी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत आहेत. यापुर्वी सादर करण्यात आलेली बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणे ऑफलाईन पध्दतीने देण्याचे कामकाज सुरु होते. त्यामुळे जी प्रकरणे दि.५ मे २०२१ पूर्वी ऑफलाईन पध्दतीने नगररचना विभागाकडे सादर झालेली आहेत. अशी सादर केलेली प्रकरणांची बांधकाम परवानगी, भोगवटयाची कामे जलद गतीने करण्यासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी नगररचना विभागामध्ये विशेष कॅम्प आयोजित करण्याचे आदेश दिलेले आहेत.
      यावेळी सदर प्रकरणामधील त्रुटींची पुर्तता करुन सर्व प्रकरणे निकाली काढणेबाबत निर्देश त्यांनी दिलेले आहेत. या अनुषंगाने नगररचना विभागामार्फत शुक्रवार, दि.१६ जुलै रोजी कोव्हीड-१९ विषाणू संसर्गाचे अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करुन कार्यालयीन वेळेत ऑफलाईन बांधकाम परवानगी व भोगवटा संबंधाने सादर नस्तीवर परवानगीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.
      दि. १ एप्रिल ते ९ जुलै अखेर २३५ बांधकाम परवानगीची प्रकरणे सादर झालेले आहेत. यापैकी १४३ प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहेत. ५१ प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत. ४१ प्रकरणांची कारवाई सुरु आहे. तरी शुक्रवार, दि.५ मे २०२१ पूर्वी ऑफलाईन सादर केलेली प्रकरणे निर्गत होण्यासाठी संबंधितांनी या विशेष कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन नगररचना विभागामार्फत करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!