बुलडाणा अर्बनच्या स्वर्गरथाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शववाहिका म्हणजेच स्वर्गरथाचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले. अद्ययावत व सुसज्ज वाहनावर आधारित ही शववाहिका गडहिंग्लजकरांच्या सेवेत दाखल झाली.
      बुलढाणा अर्बन व  विजयकुमार राजाराम शहा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय लीलावती राजाराम तुकाराम शहा यांच्या स्मरणार्थ हा स्वर्गरथ लोकार्पण केला आहे.
      यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ग्राहकसेवा आणि विश्वासार्हतेच्या जोरावर बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने देशात एक नंबरचे स्थान मिळविले आहे. सहकारातील बँकिंग बरोबरच या समूहाने जपलेली सामाजिक बांधिलकीही गौरवास्पद आहे.
       यावेळी बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, नगराध्यक्ष सौ स्वाती कोरी व उद्योजक पार्थ शहा यांनी मनोगत व्यक्त केले.
      यावेळी माजी नगराध्यक्ष किरण कदम,  माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, उद्योजक हेमंत शहा, श्यामसुंदर मर्दा, राजाराम शहा, विजयकुमार शहा आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *