उत्साह व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत जिल्ह्यातील व्यापार सुरू: ललित गांधी

Spread the love

• लसीकरण केलेल्या ग्राहकांना राजारामपुरीत विशेष सवलत
कोल्हापूर • प्रतिनिधी
      शंभर दिवसाच्या प्रदीर्घ लॉकडाऊनंतर व्यापार सुरू करताना कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार्‍यांमध्ये प्रचंड उत्साह होता, या उत्साहाबरोबरच संसर्ग रोखण्यासाठीच्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी आपले व्यापार सुरू केल्याची माहिती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे वरिष्ठ उपाध्यक्ष व ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
      कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या शंभर दिवसांच्या प्रदीर्घ लॉकडाऊनमध्ये ५ दिवस अपवाद वगळता जीवनाश्यक श्रेणी व्यतिरीक्त इतर व्यापार बंद राहिले होते. यामुळे व्यापारी आर्थिक अरिष्टात सापडले. सातत्याने मागणी करूनही दुकाने सुरू करण्याचा निर्णय होत नसल्याने शेवटी व्यापार्‍यांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या मार्गदर्शनाखाली तीव्र संघर्ष केला. व्यापार्‍यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर साहजिकच व्यापार्‍यांमध्ये उत्साह होता असे सांगून ललित गांधी पुढे म्हणाले की, व्यापार्‍यांनी उत्साहाबरोबर सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवले व सोमवारी (दि.१९) सकाळी व्यापार सुरू करताना पारंपारीक पध्दतीने सजवलेल्या बैलगाडीतून सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरासह प्रबोधन रॅलीचे आयोजन केले.
     या रॅलीमधुन मास्कशिवाय प्रवेश नाही यासह, कोरोना प्रतिबंधक चतु:सुत्रीचे व्यापारी व नागरिकांना प्रबोधन केल्याचे सांगून ललित गांधी पुढे म्हणाले की, जनतेत लसीकरणाबाबत जागृती व प्रोत्साहन मिळावे यासाठी लसीकरण करून घेतलेल्या ग्राहकांना राजारामपुरीतील सर्व प्रमुख शोरूम्स व दुकानांमधुन विशेष डिस्काउंट देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे ७२ तासाच्या आतील निगेटीव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट असेल त्यांनाही ही सवलत दिली जाईल असेही ललित गांधी यांनी सांगितले. व्यापार्‍यांनी अभिनव पध्दतीने सुरू केलेल्या उपक्रमाचे जनतेतून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.
     यावेळी सेक्रेटरी रणजित पारेख, प्रताप पोवार, प्रशांत पोकळे, श्याम बासराणी, अनिल पिंजाणी, दिपक पुरोहीत, अभिजित गुजर, गजानन पवार, महेश जेवरानी, सतीश माने, भरत रावळ, दर्शन गांधी, रहीम सनदी यांच्यासह राजारामपुरी परिसरातील व्यापारी मोठ्या उपस्थित होते.
——————————————————- Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!