प्रारूप मतदार याद्यांमध्ये असणाऱ्या त्रुटींमुळे या याद्या रद्द करा : भाजपा


कोल्हापूर • प्रतिनिधी       
      एप्रिल-मे २०२१मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने  महानगरपालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन ती रचना अंतिम केली आहे. १६ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेने सर्व प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत व या मतदार याद्यांवर अक्षेप/ हरकती नोंदवण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
     भारतीय जनता पार्टीने विविध प्रभागातील प्रारुप मतदार याद्यांचा अभ्यास केल्यानंतर या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाच्यावतीने गुरूवारी उपायुक्त निखील मोरे यांना प्रारुप मतदार याद्यांमध्ये असणाऱ्या त्रुटी दुरुस्त करण्याबाबत व या सर्व प्रक्रियेबाबत सविस्तर निवेदन सादर केले.याप्रसंगी अशोक देसाई यांनी प्रारुप मतदार यादीमधील गोंधळाबाबत सविस्तर वर्णन केले. केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नाही तर हजारोने नावे एका मतदार संघातून दुसऱ्या मतदारसंघात गेलेली आहेत. एका प्रभागातील मागील निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीत असणारी शेकडो नावे अचानक दुसर्‍या प्रभागात गेल्याचे सांगितले.
      सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी प्रारूप मतदार यादीमधील त्रुटी ही गंभीर बाब असून हरकती घेण्यासाठी जी मुदत दिली आहे त्यामध्ये मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली.
       जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे,
अमोल पालोजी, धीरज पाटील, दिनेश पसारे यांनीदेखील आपाआपल्या प्रभागातील मतदार याद्यांचा घोळ निदर्शनास आणून दिला.
      यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, विजय अग्रवाल, मंगळवार पेठ मंडल अध्यक्ष संतोष माळी, विशाल शिराळकर, अतुल चव्हाण, दिनेश पसारे, गिरीश साळुंखे, प्रीतम यादव, इक्बाल हकिम, विशाल पाटील, गणेश चिले, ओमकार घाटगे, नजीम आत्तार, धीरज पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *