इयत्ता १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

Spread the love


 कोल्हापूर • (जिमाका)
      स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी
वर्षानिमित्त जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे जिल्हास्तर, तालुकास्तर व शाळा स्तरावर १६ डिसेंबरपासून दि.२६ जानेवारी २०२२ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.आय. सी. शेख यांनी दिली आहे.
      विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सवयी, वेळेचे नियोजन, ताण-तणाव व्यवस्थापन,
दहावी-बारावी नंतर पुढे काय?, महा करियर पोर्टल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील नवीन आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांचे मानसिक सक्षमीकरण करणे, आवड, क्षमता, स्वतःमधील कौशल्य व भविष्यातील करिअरच्या योग्य संधींचा विचार करून क्षेत्र निवडणे आणि किशोरवयीन मुलांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
      विभाग प्रमुख एस. के. नवले, जिल्हा समुपदेशक सरला पाटील तसेच
जिल्ह्यातील २५ आय. व्ही. जी. एस. समुपदेशक, तालुका विषय साधन व्यक्ती, तज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!