‘थांग ता’च्यावतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त इंडियन मार्शल आर्ट थांग ता असोसिएशन कोल्हापूरच्यावतीने महावीर उद्यान येथे सोमवारी सकाळी सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रारंभी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
     याप्रसंगी सूर्यनमस्काराचे मंत्रासहित प्रात्यक्षिकसह करून घेतलेले योगा प्रशिक्षक गणेश पवार यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे सचिव सतीश वडणगेकर व विक्रम भोसले यांनी केले. यावेळी रोहित काशीद, गणेश पडवळ, भूषण जाधव, ऋत्विका शिंदे, अभिलाशा भोसले आदींसह प्रशिक्षक, खेळाडू व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!