एकावडे ट्रस्टच्यावतीने पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी


कोल्हापूर • प्रतिनिधी 
     राधानगरी येथील कै. रेवताबाई एकावडे ट्रस्टच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण संतुलनाचा संदेश देत वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
     वटपौर्णिमेचे औचित्य साधून एकावडे  ट्रस्टच्यावतीने यावेळी विरंगुळा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. विजया निंबाळकर यांच्या हस्ते उपस्थित महिलांना वृक्षाचे रोप  वाटप करण्यात आले. कोणत्याही उपक्रमात महिला प्रभावीपणे कार्य करत असतात म्हणून पर्यावरण संतुलनासाठी महिलांनी पर्यावरणपूरक उपक्रमात यापुढे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विरंगुळा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. विजया निंबाळकर यांनी केले.
     पर्यावरणाचा संदेश पोहोचवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या आवारात महिलांच्या उपस्थित वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. एकावडे ट्रस्टच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण आदी विषयावर उपक्रम राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम साजरा करण्यात आला.
      याप्रसंगी कै. रेवताबाई एकावडे ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. लता एकावडे यांच्या हस्ते उपस्थित महिलांना वाण देण्यात आले. यावेळी सौ. सीमा रासम, सौ. शितल रासम, सौ. स्मिता चव्हाण, सौ. मनीषा घोटणे, सौ. रंजना चव्हाण, सौ. अंजना चव्हाण, सौ. सुनीता चव्हाण यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *