दलितमित्र स्व.दिनकरराव यादव यांची जयंती साजरी

Spread the love

• श्री दत्त साखर कारखाना शिरोळ येथील पुतळ्यास अभिवादन  
कोल्हापूर • प्रतिनिधी
       कारखान्याचे आद्य संस्थापक, माजी आमदार, माजी जि.प.अध्यक्ष दलितमित्र स्व.दिनकरराव भाऊसाहेब यादव यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली.
       याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व.दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक रघुनाथ पाटील यांनी, स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजित पाटील व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शिरोळचे माजी उपसरपंच पृथ्वीराज यादव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  
     यावेळी उपस्थित संचालक, इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी संचालक शरदचंद्र विश्वनाथ पाठक, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, निजामसो पाटील, महेंद्र बागे, विजय सुर्यवंशी, दरगू माने-गावडे, बाळासाहेब पाटील-हालसवडे, कामगार संचालक प्रदिप बनगे तसेच कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे, मॅनेजर फायनान्स एस.एम.भोसले, शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, सिव्हील इंजिनियर (प्रोजेक्ट) पी. एम. पाटील, सिव्हील इंजिनियर यशवंत माने, मॅनेजर पर्यावरण सुनिल पाटील, वर्क्स मॅनेजर एस.एच.संकपाळ, प्रॉडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, स्टोअरकिपर एस.व्ही.शिंदे, डिस्टीलरी मॅनेजर एस.के.यादव, लेबर वेल्फेअर ऑफिसर जे.बी.देसाई, हेड टाईमकिपर आर.एम.केरीपाळे, ऊर्जाकुर मॅनेजर व्ही.आर.इंगळे, गेस्टहाऊस इनचार्ज शक्तिजीत गुरव, सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाो गावडे, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, परचेस ऑफिसर व्ही.टी.माळी, सुरक्षा अधिकारी एस.व्ही.घारगे, केनयार्ड सुपरवायझर जे.एच.जाधव, सिनि. सॉ. ॲनालायझर ए.एस.पाटील, कामगार युनियनचे माजी अध्यक्ष नाना कदम, इकबाल मोकाशी, बाबूराव कदम यांच्यासह कामगार सोसायटी, दत्त भांडार, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ यांचे पदाधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!