स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार

Spread the love

• ना.आदित्य ठाकरे व मल्हार सुर्वे यांच्या वाढदिवसनिमित्त
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर  स्मशानभूमीत जीवाची बाजी लाऊन काम करणाऱ्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. युवासेना अध्यक्ष व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच हर्षल सुर्वे यांचे चिरंजीव मल्हार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमप्रसंगी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजन करण्यात आले.
      ना. आदित्य ठाकरे आणि मल्हार सुर्वे यांचा रविवारी (दि.१३) वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त रविवारी दुपारी ठीक १२ वाजता कोल्हापूरात स्मशानभूमी येथे हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन हर्षल सुर्वे यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, सुजितभाऊ चव्हाण, सुरेश साळोखे, शिवाजीराव जाधव, डॉ. व्यंकटेश पवार, हर्षल सुर्वे, देवाळेचे  उपसरपंच संजय धुमाळ, अवधूत साळोखे तसेच शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!