कणेरीमठ येथील कोविड सेंटरला चंद्रकांतदादांनी दिली भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कणेरीमठ येथे प.पू.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या पुढाकाराने व भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने ७ व्हेंटिलेटर बेड,२७ ऑक्सिजन बेड,१३ सामान्य बेड असे ४० बेड असणारे कोविड सेंटर सुरू आहे. या कोविड सेंटरला आज आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली.
    कोल्हापूरात कोरोना स्थिती गंभीर होत चालली आहे. कोविड पेशंटना बेड मिळत नाही आहेत. रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा,ऑक्सिजनचा आभाव‌ यामुळे पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली आहे. अशा स्थितीत पेशंट‌ व पेशंटच्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी भाजपा सतत सेवा कार्य करत आहे. “रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून कणेरी मठ येथे प.पू.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या पुढाकाराने व भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने ७ व्हेंटिलेटर बेड,२७ ऑक्सिजन बेड,१३ सामान्य बेड असे ४० बेड असणारे कोविड सेंटर सुरू आहे.
     या कोविड सेंटरला आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली. प.पू.काडसिद्धेश्वर महाराज व डॉक्टर यांच्याशी चर्चा केल्यावर सेंटरला ऑक्सिजनचा‌‌ आभाव असल्याचे लक्षात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी तातडीने लागेल ती मदत करून ऑक्सिजन प्लांट उभा करण्याच्या सुचना संबंधितांना केल्या. तसेच कोविड सेंटरला येणाऱ्या अडचणींबद्दल व पेशंट बाबतीत आम.चंद्रकांतदादा पाटील व प.पू काडसिद्धेश्वर महाराज यांनी सविस्तर चर्चा केली आणि सेंटरला लागेल ती मदत करण्याची ग्वाही आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
       यावेळी प.पू.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सेंटरचे डॉक्टर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!