कोल्हापूर • प्रतिनिधी
नाईक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आदर्श वर्तणुकीद्वारे बाजार समितीची प्रतिमा उंचावली, असे प्रतिपादन सचिव जयवंत पाटील यांनी केले. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नाईक पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय जीवन कसे असते हे जाणून घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी १९८४ मध्ये कोल्हापूर ते नवी दिल्लीपर्यंत सायकल प्रवास केला होता. नोकरीबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असा असून त्यांच्या वर्तणुकीमुळे बाजार समितीची प्रतिमा उंचावली असल्याचे सचिव जयवंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमास बाजार समितीचे उपसचिव राहुल सूर्यवंशी, तानाजी दळवी तसेच अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, अडते, माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित हो