आ.चंद्रकांतदादा पाटील यांची शिवाजी विद्यापीठ व न्यू कॉलेजला सदिच्छा भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज शिवाजी विद्यापीठास नॅकचे A++ मानांकन व न्यू कॉलेजला A+ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सदिच्छा भेट दिली.
      नुकतेच शिवाजी विद्यापीठास नॅकचे ३.५२ ‘सीजीपीए’ गुणांकनासह A++ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या या उल्लेखनीय मानांकनाबद्दल आम. चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
      याप्रसंगी आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठाला मिळालेल्या मानांकनाबाबत व विविध शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा केली.  या मानांकनामुळे विद्यापीठाची जबाबदारी वाढली असून पुढील मानांकन प्राप्त होण्यासाठी तसेच विद्यापीठाचा नांवलौकिक वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, रजिस्टार डॉ.व्ही.डी.नांदवडेकर, डॉ. आर. के. कामत, प्रा.एन.बी.गायकवाड, प्रा.एम.एस देशमुख आदी उपस्थित होते.
       दरम्यान, आज शिवाजी विद्यापीठामध्ये नो व्हेइकल डे असल्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठाच्या गेटपासून ते मुख्य इमारतीपर्यंतचा प्रवास विद्यापीठाच्या बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून केला. पर्यावरणपूरक या उपक्रमाचे दादांनी कौतुक केले.
           न्यू कॉलेजला सदिच्छा भेट…..
       शिवाजी विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सर्वोच्च मानांकन असणारे नॅकचे A+ हे मानांकन बुधवारी न्यू कॉलेजला प्राप्त झाले. यानिमित्य भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यू कॉलेजला सदिच्छा भेट दिली. प्राचार्य डॉ.व्ही.एम.पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व कॉलेजचे कौतुक केले. या मिळालेल्या मानांकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कॉलेजला नवी उर्जा मिळेल यातून अधिक-अधिक चांगले विद्यार्थी व खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत याप्रसंगी प्राचार्य डॉ.व्ही.एम.पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, उपप्राचार्य डॉ. एम. शेख,  नॅक को-ऑर्डिनेटर डॉ.एन.व्ही पवार, आर.डी.धमकले आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!