कोल्हापूर • प्रतिनिधी
बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या अन्नपूर्णा सुनील कांबळे हिने १०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये रौप्य आणि १०० मीटर बेस्ट स्ट्रोक प्रकारात कास्य अशी तीन पदके पटकावली. जलतरणपटू अन्नपूर्णा कांबळे हिच्या या घवघवीत यशाबद्दल सोमवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी तिच्या घरी भेट देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आम.चंद्रकांतदादा पाटील यांनी अन्नपूर्णा कांबळे हिला पुढील स्पर्धेसाठी आवश्यक बाबींसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सुनील कांबळे, निशा कांबळे, देविकाराणी कांबळे, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.