कोल्हापूर चेंबरच्या वतीने मनपा नुतन आयुक्तांचे स्वागत


कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर महानगर पालिकेच्या नुतन आयुक्त म्हणून डॉ. कांदबरी बलकवडे यांनी पदभार स्विकारला. ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ आणि सर्व संलग्न संस्था यांचेवतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आयुक्त यांनी ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ आणि सर्व संलग्न संस्था यांचे आभार मानले. तसेच सन २०१९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेला पूरपरिस्थितीवेळी व मार्च महिन्यापासून आलेल्या कोविड १९ या महामारीच्या काळात ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ तर्फे जे सामाजीक स्तूत्य उपक्रम राबविले याबद्दल अभिनंदन केले.
शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअतंर्गत ‘मास्क नाही – प्रवेश नाही – माल नाही’ या घोषणेची सुरवात व सक्षम कार्यवाही कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनी ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ च्या माध्यमातून राबविल्याची दखल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेऊन, कौतुक केले व ही गोष्ट कोल्हापूरसाठी भूषणावह असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
“येत्या दसरा व दिवाळी या सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनी योग्य नियमांचे पालन करून सुरक्षीत व्यापार करावा.” अशी अपेक्षा मा. आयुक्तांनी व्यक्त केली. तसेच, “चेंबरकडील व्यापार व उद्योगाचे प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिकेतर्फे प्राधान्य देऊ.” असे आश्वासन दिले.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव वैभव सावर्डेकर, संचालक राहूल नष्टे, अजित कोठारी व प्रशांत शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *