महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या कार्यकारी समितीवर चेतन नरके


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महाराष्ट्रातील कृषी पदवीधर आणि कृषि तंत्रज्ञानाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी  समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून कोल्हापूरचे चेतन अरुण नरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  
     संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांची सभा नुकतीच कृषी विद्यालय पुणे येथे झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.                     
     संस्थेचे अध्यक्ष आणि डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायदे, उपाध्यक्ष आणि माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, माजी अध्यक्ष आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख, डॉ. रामकृष्ण मुळे, डॉ. सुदाम अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.
      चेतन नरके हे उच्च विद्याविभूषित असून युरोप आणि आशियाई देशातील प्रसिद्ध अर्थ व्यवस्थापक आहेत. सध्या ते थायलंड देशाच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार म्हणून काम करत आहेत.
           —————————
     माझा आजवरच अनुभव, ज्ञान आणि या संधीचा उपयोग करून महाराष्ट्रातील कृषी मालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि त्यासोबत  शेतकऱ्यांच्या कृषी मालाला अधिक भाव मिळवून देण्याकरिता करीन.
              – चेतन नरके, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *