छत्रपती शिवाजी स्पोर्टिंगतर्फे ‘एस.के. चषक २०२२’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी स्पोर्टिंगच्यावतीने एस.के.चषक २०२२ टर्फ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ व २८ जानेवारी रोजी शाहू दयानंद हायस्कूलसमोरील टीकी टाका टर्फ येथे ही स्पर्धा होणार आहे.
      स्पर्धेतील विजेत्या संघास ७००१/- रुपये व चषक तर उपविजेत्या संघाला ४००१/- रुपये व चषक तसेच स्पर्धेतील मालिकावीर व बेस्ट गोलरकिपर यांना आकर्षक ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार आहे.
      स्पर्धेसाठी ८०० रुपये प्रवेश फी असून प्रथम ३२ संघांना प्राधान्य आहे. प्रत्येक संघात ६ खेळाडू व २ खेळाडू राखीव राहतील. स्पर्धेसंबंधी इतर नियम व अटी यासाठी अरविंद खेडकर (मो.नं.८२३७३०६०९०), अभिजीत पाटील (मो.नं.८५५२८७१४१४), राजेश खेडकर (मो.नं.९०९६८१०८२०) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!