मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केली मतमोजणी कक्षाची पाहणी

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका) 
        प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी राजाराम तलाव परिसरातील गोदाम येथील मतमोजणी कक्ष व स्ट्रॉंग रुमची पाहणी केली. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, पन्हाळा उपविभागीय अधिकारी अमित माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी(कोल्हापूर शहर) मंगेश चव्हाण,तहसीलदार संतोष कणसे आदी उपस्थित होते.
       मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, मतमोजणीच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा द्या. तसेच कर्मचाऱ्यांसाठीही आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर उपलब्ध करुन देण्यात यावे, यासह निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना श्री. देशपांडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
      उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे व तहसीलदार संतोष कणसे यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!