कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या या कार्यक्रमात शहराध्यक्ष आर.के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली, पक्षाचे माजी नगरसेवक आदिल फरास व पक्षाचे कार्यकर्ते राजाराम मटकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी विविध वक्त्यांनी शाहू गौरवपर भाषणे केली. या कार्यक्रमास सरचिटणीस सुनील देसाई, अशोक भंडारे, सुमन वाडेकर, महादेव पाटील, सुहास साळोखे, शितल तिवडे, फिरोज सरगुर, नागेश जाधव, नागेश फरांडे, श्वेता बडोदेकर, संजय आचरेकर, निशिकांत सरनाईक, राजाराम सुतार, राजेंद्र ओमकर, जीवन महापुरे, बी.के. भास्कर, प्रतिक गायकवाड, भास्कर सोरटे, अविनाश माने, आनंदराव पोलादे, पप्पू जाधव, कैलास मुडशिंगीकर, गफूर शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.