कोल्हापूर • प्रतिनिधी
क्लॅक्स सोल्युशन मयूर स्पोर्टस् अॅकॅडमीने मंगलमूर्ती क्रिकेट ॲकॅडमीवर १३ धावांनी मात करून ब गट वसंतराव चौगुले चषकावर “विजेता” म्हणून नांव कोरले. मंगलमूर्ती क्रिकेट ॲकॅडमीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
राजाराम कॉलेज येथे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व श्री. वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था पुरस्कृत “वसंतराव चौगुले चषक” ब गट क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना क्लॅक्स सोल्युशन मयूर स्पोर्टस् ॲकॅडमी विरूध्द मंगलमूर्ती क्रिकेट ॲकॅडमी, टोप यांच्यामध्ये झाला.
प्रथम फलदांजी करताना क्लॅक्स सोल्युशन मयूर स्पोर्टस् ॲकॅडमीने ३८.१ षटकांत सर्वबाद १७७ धावा केल्या. यामध्ये रेहान सनदी ४७, जयदीप पाटील ३४, प्रकाश केसरकर २१, प्रसाद पाटील १८ धावा केल्या. मंगलमूर्ती क्रिकेट ॲकॅडमीकडून सुरेश सातपुतेने ४, प्रकाश सातपुते व अनिल माळी यांनी प्रत्येकी २, वैभव नलवडे व सखाराम माळी यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.
उत्तरादाखल खेळताना मंगलमूर्ती क्रिकेट ॲकॅडमीने ३७.३ षटकांत सर्वबाद १६४ धावा केल्या. यामध्ये सुरेश सातपुते ५१, शैलेश थोरात २७, वैभव नलवडे २२, प्रविण होवाळ २० धावा केल्या. क्लॅक्स सोल्युशन मयूर स्पोर्टस् ॲकॅडमीकडून नझीर शेखने ५ बळी तर प्रसाद पाटील व बाबजी सनदी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
विजेता संघ
बाबजी सनदी (कर्णधार), वैभव पाटील, चेतन शिंगटे, जयदिप पाटील, कपिल धर्माधिकारी, मुकुल शहा, नझीर शेख, प्रकाश केसरकर, प्रसाद पाटील, रेहान सनदी, रोहीत उडाळे, शिवकुमार यादव.