कोल्हापूर • प्रतिनिधी
शहरामध्ये रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये १ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९४ वा रविवार असून या अभियानामध्ये स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर व कार्यकर्ते, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैदयकिय अधिकारी डॉ. विजय पाटील, माजी नगरसेवक विलास वास्कर, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. हि मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदरची स्वच्छता ताराराणी चौक ते तावडे हॉटेल संपुर्ण रोड परिसर, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ मेन रोड परिसर, सीपीआर चौक ते तोरस्कर चौक, पंचगंगा घाट, स्मशानभूमी संपूर्ण परिसर, संपूर्ण माऊली पुतळा ते जनता बाझार परिसर, क्रीडा संकुल मेन रोड परिसर, रंकाळा परिसर येथे करण्यात आली.
यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, स्वरा फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, अमित देशपांडे, डॉ.अविनाश शिंदे, आयुष शिंदे, फैजान देसाई, यश रुकडीकर, मुकुंद कांबळे, शेखर वडणगेकर, आरोग्य निरीक्षक सुशांत कावडे, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, महेश भोसले, श्रीराज होळकर, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.