स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत विविध ऑनलाईन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ अंतर्गत झिंगल, शॉर्ट मुव्हीज, पोस्टर ॲण्ड ड्रॉईंग, म्युरलर्स, स्ट्रिट प्ले अशा विविध ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेंचे पारितोषिक वितरण महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात करण्यात आले.
     स्वच्छ सर्व्हेक्षण२०२१ अंतर्गत शासनाकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन प्रमाणे स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ या अभियानामध्ये शहरातील नागरीकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळण्याच्या उद्देशाने महापालिकेने दि.१९ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत विविध ऑनलाईन स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेमध्ये प्राप्त झालेल्या विविध कलाकृतींची कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून तपासणी करुन घेण्यात आली.
     यामध्ये झिंगल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संग्राम भालकर, द्वितीय क्रमांक अमोल गायकवाड, तृतीय क्रमांक रविराज पोवार यांनी पटकाविला. शॉर्ट मुव्हीज स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रसाद शेडे, द्वितीय क्रमांक श्रीधर काटवे, तृतीय क्रमांक योगिता राजगोळकर यांनी पटकाविला. पोस्टर ॲण्ड ड्रॉईंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संजय शिंदे, द्वितीय क्रमांक सोनू गोरल, तृतीय क्रमांक स्नेहल कांबळे यांनी पटकाविला. म्युरलर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक अमोल गायकवाड, द्वितीय क्रमांक राहूल वास्कर, तृतीय क्रमांक प्रमोद माजगांवकर यांनी तर स्ट्रिट प्ले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आसावरी लोहार व ग्रुप, द्वितीय क्रमांक गणेश पाटील, तृतीय क्रमांक कर्तव्यदक्ष सेना (गणेश पाटील) यांनी पटकाविला.
     स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रु.२००१/- चा धनादेश व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमाकांस रु.१५०१/- चा धनादेश व प्रशस्तीपत्र व तृतीय क्रमांकाला रु.१००१/- चा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमापुर्वी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत हरीत कायदा शपथ घेण्यात आली.
     यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविंद्र आडसूळ, निखिल मोरे, सहा.आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य लेखापरिक्षक वर्षा परिट, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता समिर व्याघ्रांबरे, मुख्याध्यापिका सौ.अंजली जाधव, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!