कोल्हापूर • प्रतिनिधी
शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहिम राबविण्याच्या सुचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी मुख्य आरोग्य निरिक्षक यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची ३०ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता करण्यात येणार आहे. पूर्ण क्षमतेने हबक पध्दतीने कर्मचारी लावून साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आरोग्य निरिक्षक यांनी आपले अधिनस्त प्रभागातील सर्व मुख्य रस्त्यांची या कालावधीत स्वच्छता करून घेण्याबाबतचे नियेाजन करण्यात आले आहे. मंगळवारी व बुधवारी ही स्वच्छता मोहिम खानविलकर पेट्रोल पंप ते सर्किट हाऊस, खानविलकर पेट्रोल पंप ते भगवा चौक, कावळा नाका ते मार्केट यार्ड, कळंबा जेल ते इंदिरा सागर हॉटेल, सीपीआर चौक ते दसरा चौक विल्सन पूल, सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, जावळाचा गणपती ते फुलेवाडी मेन रोड, शिवाजी विद्यापीठ ते मिलिटरी कॅम्प, मिलिटरी कॅम्प ते केएसबीपी चौक, कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा नाका, कळंबा नाका ते चिवा बाजार चौक, तलवार चौक ते नवीन वाशी नाका येथे राबविण्यात आली.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी महावीर कॉलेज मेनरोड, जिल्हाधिकारी मेनरोड, खानविलकर पंप मेनरोड, गंगावेश व पापाची तिकटी या ठिकाणी साफसफाई होत असलेल्या कामाची पाहणी केली. स्वच्छतेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणेसाठी अति-आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ व सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, विनायक औंधकर यांची नियत्रंण अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. ३० ऑक्टोबरअखेर शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची साफसफाई पूर्ण करण्यात येणार आहे.
——————————————————-