पांजरपोळ प्रभागातील सफाई कामगारांचा सत्कार


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. अशा परिस्थितीतसुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पाटील यांनी प्रभाग क्रमांक ४२ पांजरपोळ येथे सफाईचे काम करत असलेल्या सर्व  कामगारांचा सत्कार केला.
     पांजरपोळ प्रभागातील सर्व महिला  सफाई कर्मचाऱ्यांचा साडी – चोळी, गुलाबपुष्प, मास्क व सॅनिटायझर देऊन  तर पुरुष कर्मचाऱ्यांचा कॅप, मास्क, सॅनिटायझर व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
     यावेळी माजी नगरसेविका पद्मावती पाटील, काकासाहेब पाटील, दिवाकर पोर्लेकर, विक्रम आडनाईक, प्रथमेश केटर्सचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग  घराळ, गणेश शिंदे, किरण खतकर यांच्यासह प्रभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *