कोल्हापूर • प्रतिनिधी
संविधान दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२६) महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन कार्यक्रमास मुख्य लेखापरिक्षक मिलिंद कुलकर्णी, उपशहर अभियंता नारायण भोसले, बाबुराव दबडे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, नगरसचिव सुनिल बिद्रे, रवका अधिकारी अशोक यादव, सहाय्यक अभियंता अरुण गवळी, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, उमेश बागुल, स्थानिक अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.