घोडावत पॉलीटेक्नीकमध्ये शासनमान्य अधिकृत प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत संजय घोडावत पॉलीटेक्निकला अधिकृत प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी सुविधा केंद्राची परवानगी मिळाली असल्याची माहिती प्राचार्य विराट गिरी यांनी दिली.
     इयत्ता १० वी मध्ये ३५ % व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत आपले नाव नोंदणी करता येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया ३० जून पासून सुरु करण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या प्रवेश प्रक्रियेमध्ये दोन पर्याय पर्याय असणार आहेत. यामध्ये प्रत्यक्ष स्क्रूटनी म्हणजेच जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन अर्ज निश्चिती करणे किंवा ई-स्क्रूटनी अर्थातच घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे.
तसेच ऑनलाईन नोंदणी करणे व अर्ज निश्चित करण्यासाठी २३ जुलै, तात्पुरती गुणवत्ता यादी तापसण्यासाठी २६ जुलै, अर्ज दुरुस्ती किंवा तक्रार असल्यास २७ ते २९ जुलै आणि अंतिम गुणवत्ता यादी तपासण्यासाठी ३१ जुलै अशी मुदत आहे.
     याबाबत बोलताना संस्थेचे प्राचार्य विराट गिरी म्हणाले, ”विद्यार्थ्यांनी प्रथम ऑनलाईन किट घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन किटसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४०० रुपये व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क आकारले जाते. किट कार्यान्वित केल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करणे, कागदपत्रांची तपासणी व पडताळणी याचबरोबर ऑनलाईन अर्ज निश्चिती या सर्व प्रक्रिया या सुविधा केंद्रामार्फत दिल्या जाणार आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत नाव नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती मिळतात”.
     डिप्लोमा इंजिनीरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्रामार्फत आपले अर्ज निश्चिती करू शकतात. ज्या विद्यार्थी व पालकांना सुविधा केंद्रावर येथे येणे शक्य नाही त्यांनादेखील घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यामुळे या सर्व प्रक्रियेसाठी लागणारी माहिती व त्याचे योग्य समुपदेशन करण्यासाठी संजय घोडावत पॉलीटेक्निकमध्ये स्वतंत्र समुपदेशन कक्ष तयार करण्यात आला आहे. या सुविधा केंद्रामार्फत तज्ज्ञ प्राध्यापकांकडून विद्यार्थी व पालकांना या सर्व प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जात आहे. सर्व सुट्टीच्या दिवशी देखील ही प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे.
      या उपक्रमाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त   विनायक भोसले यांनी विद्यार्थी व पालकांना पुढील प्रक्रियेस शुभेच्छा दिल्या आहेत. 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!