शिरोळमध्ये सच्छिद्र निचरा प्रणाली अंतर्गत पाईपलाईन कामाचा शुभारंभ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       शिरोळमधील शेतकरी निनाद भोसले व निलेश मोरे यांच्या शेतात क्षारमुक्त जमीन करण्यासाठी फलदायी ठरलेली सच्छिद्र निचरा प्रणाली अंतर्गत पाईपलाईन कामाचा शुभारंभ दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
      शिरोळ तालुक्यात राबवित असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा पॅटर्न फायदेशीर ठरत असल्यामुळे नापीक जमिनी सुपीक होऊन शेतकरी समृद्ध होत आहे असे प्रतिपादन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
      याप्रसंगी गणपतराव पाटील यांनी सच्छिद्र निचरा प्रणाली पाईपलाईनचे काम पूर्ण झालेल्या शेतजमिनीची पहाणी केली. तसेच हा उपक्रम राबविण्यासाठी दत्त उद्योग समूह आणि डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन दिले.
      निनाद भोसले व मेजर प्रा. काशिनाथ भोसले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी दत्त साखर कारखान्याचे संचालक महेंद्र बागी, दत्त ग्राहक भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, दत्त साखर कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाना, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, माती परीक्षण केंद्राचे प्रमुख ए. एस. पाटील, श्री बुवाफन महाराज क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थेचे चेअरमन बाबा पाटील नदेकर, संचालक संजय उर्फ संभाजी चव्हाण, लियाकत सनदी, गुरुदत्त देसाई, जयसिंग माने, शिवाजी पाटील कौलवकर, प्रफुल कोळी, दत्तात्रय खडके, पिंटू वटें, सौ. कल्पना भोसले, सौ. प्रतिभा भोसले, अजय भोसले, ओंकार भोसले, निलेश मोरे, पंकज शहापुरे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!