वसगडे गावातील पूरबाधीत क्षेत्राचे पाच दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करा

Spread the love

• पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
कोल्हापूर • प्रतिनिधी
     करवीर तालुक्यातील वसगडे गावातील पूरबाधीत क्षेत्राचे पाच दिवसाच्या आत पंचनामे पूर्ण करा, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिले.
     वसगडे गावाला महापुराचा फटका बसला आहे. गावातील सुमारे ३५० हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले असून गावातील अनेक घरेही पाण्याखाली गेली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज या गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून गावातील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गावातील जेवढी घरे पाण्याखाली जातात त्यांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन तयार असून ग्रामस्थांनी याला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, गावातील पुरबाधित क्षेत्राचे पाच दिवसाच्या आत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
     यावेळी आ. ऋतुराज पाटील, पंचायत समिती सदस्य शोभा राजमाने, सरपंच नेमगोंडा पाटील, पोलीस पाटील संजय पाटील, डॉ.सी.एस.पाटील, सुनील पाटील, डॉ.श्रीकांत चौगुले, भुजगोंड पाटील, रायगोंड पाटील, विजय पाटील, सचिन पाटील, सुदाम सोनवणे, रावसाहेब झोरे, बाळासाहेब उपाध्ये, धुळगोंडा पाटील, कृषी सहाय्यक स्मिता नवलगे, गटविकास अधिकारी जयवंत उगलेयांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
—————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!