कोल्हापूर • प्रतिनिधी
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर सितारगंज व कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने “सौर ऊर्जा तंत्रज्ञान” या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली अशी माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे यांनी दिली.
या कार्यशाळेमध्ये सौर ऊर्जा तंत्रज्ञानाची आवड असणारे आणि या क्षेत्रात काम करीत असणारे युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे या कार्यशाळेस सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्रीचे विद्यार्थी यांचादेखील सहभाग होता. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एमएसएमईचे आदित्य चौधरी आणि त्यांची टीम आहे.
या कार्यशाळेस सहभागी होणाऱ्या सर्वांना एमएसएमईचे शासनमान्य ई प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रमाणपत्राचा उपयोग उद्योग आधार नोंदणीसाठी तसेच शासकीय योजनेतील कर्ज प्रकरणासाठी उपयुक्त असेल.
या कायर्शाळेच्या आयोजनाला प्रा. अजय कोंगे, प्रा. एन.एस. पाटील आणि प्रा. एस.बी.वाटेगावकर यांचे सहकार्य लाभले.