वीजग्राहकांनो, विविध माहितीच्या ‘एसएमएस’साठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करा: महावितरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरु असलेल्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर एकूण ११ लाख ४ हजार ४७६ ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत महावितरणकडे मोबाईल क्रमाकांची नोंदणी केली आहे. या सर्व ग्राहकांना मीटर रिंडींग, वीजबिलाचा तपशील, वीजपुरवठा खंडित करण्याची अधिकृत नोटीस तसेच वीजपुरवठ्याशी संबंधीत व इतर विविध माहितीचा तपशीलाची माहिती नियमितपणे ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे.
      दरम्यान, अनेक ठिकाणी भाडेतत्वावर दिलेल्या घरातील स्वतंत्र वीजजोडणीचा ग्राहक क्रमांकासोबत घरमालकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी वीजबिल भरणाऱ्या भाडेकरू वीजवापरकर्त्यांना योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र वीजजोडणी असलेल्या घरातील भाडेकरू वीजवापरकर्त्यांनी संबंधीत ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी किंवा चुकीचे मोबाईल क्रमांक दुरुस्त करावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
     महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना दरमहा वीजबिलांची रक्कम व इतर तपशील, वीजपुरवठा खंडित करण्याची अधिकृत नोटीस, मीटर रिडींग पाठविण्याचे आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या तसेच पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी आदींची माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ७०३ वीजग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही.
     ज्या ग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही त्यांना ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ९९३०३९९३०३ क्रमांकावर ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४x७ सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!