महाराष्ट्र-गोवा व्यापार वृध्दिसाठी चेंबर ऑफ कॉमर्ससोबत संयुक्त उपक्रमास सहकार्य

Spread the love

• मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे ललित गांधी यांना आश्‍वासन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्र व गोवा या दोन्ही शेजारी राज्यांत सांस्कृतिक व व्यापारी, ऋणानुबंध असून आंतरराज्य व्यापार-उद्योग वृध्दिसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने दिलेल्या विविध संयुक्त उपक्रमांच्या प्रस्तांवासाठी सहकार्य करू अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ललित गांधी यांना दिली.
      मुख्यमंत्री प्रमोद सावंत शनिवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले असता ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यात उद्योग-व्यापार-पर्यटन व आय.टी. क्षेत्रात सहयोगासंबंधी विविध योजनांचा प्रस्ताव सादर केला त्याप्रसंगी ते बोलत होते.
     या प्रस्तावावर पुढील निर्णयासाठी लवकरच पणजी येथे ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या पदाधिकार्‍यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नमुद केले.
यावेळी भेटलेल्या शिष्टमंडळात भरत गांधी, योगेश केरकर, परशुराम सातार्डेकर, दर्शन गांधी यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!