कोल्हापूर • (जि.मा.का)
कोरोना कालखंडात जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य विभागाने एकत्रित येवून कोरोनाचा केलेला मुकाबला या कॉफी टेबल बुकच्या निमित्ताने संग्रही ठेवण्यायोग्य झाला असून प्रशासनासाठी तो महत्वाचा दस्ताऐवज ठरेल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील व्यक्त केला.
शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात छोटेखानी समारंभात जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या कॉफी टेबल बुकचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, प्रशासनाने केलेल्या कामाचा लेखाजोगा या कॉफी टेबल बुकमध्ये ठळकपणाने दिसतो आहे. तसेच भविष्यात कोरोनाला कशा पध्दतीने सामोरे गेले पाहिजे याचेही मार्गदर्शन या पुस्तकातून होत आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान (अ.का.), माहिती अधिकारी वृषाली पाटील, रोहित कांबळे, सतीश शेडगे, अनिल यमकर, सतीश कोरे, दामू दाते यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.