काँग्रेस सेवादलतर्फे आयसोलेशन येथे कोरोना योध्द्यांचा सत्कार


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर शहर आरोग्यवर्धिणी केंद्र क्र.७ आयसोलेशन येथे कोरोना महामारीच्या संकटात जिवाची बाजी लावून रुग्णाची सेवा बजावणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांचा काँग्रेस सेवादलाच्या वतीने सत्कार करुन खाद्यकीट वाटप करण्यात आले.
    यावेळी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष रंगराव देवणे, काँग्रेस शहर ब्लाँक कमिटी अध्यक्ष किशोर खानविलकर, माजी नगरसेविका सौ. लिलाताई धुमाळ, महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा सौ. हेमलता माने, काँग्रेस शहर उपाध्यक्ष डॉ. प्रमोद बुलबुले, काँग्रेस ब्लॉक उपाध्यक्ष अनवर शेख, डॉ. अर्पिता खैरमोडे, दिप्ती मोरे, वृषाली तिरमारे, शुभांगी लोहार, सरिता चोपडे, निलोफर मुजावर, कोमल गुरव, जयश्री लाटकर, रेवती शिंदे, सायरा मुजावर, सरिता मोरे, ज्योती पेटकर, शितल कदम आदींसह डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *